Kai. Narayanrao Raote Shikshan Prasarak Mandal, Hingoli
logo Logo

ए बी एम इंग्लिश हायस्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

हिंगोली : शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या एबीएम इंग्लिश हायस्कूल हिंगोली येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता , जिल्हा शिक्षण अधिकारी असावरी काळे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार , ज्योती कंदी समकीत दोडल तसेच संस्थेचे अध्यक्ष दिलीप बांगर , अजिंक्य बांगर, शाळेचे मुख्याध्यापक जोसेफ के जे, उप मुख्याध्यापक आदेश बोराळकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती सर्वांच्या उपस्थितीमध्ये सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्व उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . याप्रसंगी िल्हाधिकारी जिल्हाधिकारी बोलताना म्हणाले की एबीएम इंग्लिश हायस्कूल ही खूप शिस्तप्रिय शाळा आहे या विद्यार्थ्यांना आधुनिक काळात आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी या शाळेमध्ये उपलब्ध आहेत शाळेची पाहणी करत असताना अगदी बारकाईने त्यांनी बऱ्याच गोष्टीची पाहणी केली व शाळेचे कौतुकही केले शाळेत मिळत असलेले शिक्षण विद्यार्थ्यांची गुणवत्ता शाळेचा परिसर वर्ग खोल्या इत्यादी गोष्टी अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या असून शाळा एक शिस्तप्रिय शाळा आहे असे ते म्हणाले त्याचप्रमाणे शाळेच्या सांस्कृतिक पाहत असताना ते म्हणाले की आजच्या यांत्रिक आधुनिक काळात मैदानी खेळाची खूप कमतरता आहे शाळेत पारंपारिक खेळाचे आयोजन करत असताना मल्लखांबच्या विद्यार्थ्यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले गेल्या कित्येक दिवसात त्यांनी शाळेमध्ये असे खेळ पाहिले नाही पण ही एकमेव अशी शाळा आहे की जिथे मल्लखांब सारख्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात खरोखरच ही कौतुकाची गोष्ट आहे असेही ते म्हणाले आणि त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने मल्लखांब खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले अत्यंत उत्कृष्ट कामगिरी सफाईदार कला विद्यार्थ्यांनी मल्लखांब मध्ये दाखवली त्याचप्रमाणे आत्मविश्वास वाढवणारेहे खेळ आहेत असे ते म्हणाले फायर जंपनेही माझे मन जिंकून घेतलेले आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी जे काही कला सादर केल्या त्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती भरभरून दिसत आहे आपल्या भाषणात ते बोलताना असे म्हणाले की ही शाळा केवळ शिक्षण देत नाही तर विद्यार्थ्यांना एक माणूस म्हणून घडवते तसेच महाराष्ट्राची संस्कृती कला सांस्कृतिक विकास याही गोष्टीवर भर देते एकंदरीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास हा इथे परिपूर्ण होतो असेही ते म्हणाले शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरचा वारसा घेत त्यानिमित्ताने कार्यक्रम सादर केले त्यामध्ये लोकगीत लोकनाट्य भारुड लावणी गवळणी भजन कीर्तन गोंधळ वासुदेव अशा अनेक गोष्टी लोकांसमोर पसादर करत अत्यंत नयनरम्य असे कलाप्रकार सादर केले हे सर्व कार्यक्रम पाहून उपस्थित पालक वर्ग अगदी भारावून गेला खरोखरच त्यांनी अगदी नर्सरी पासून ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या कलागुणांना व संस्कृतींना लक्षात घेऊन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचे कलागुण सादर केले पालकांनी भरभरून कौतुक केले शेवटी सर्वांनी मिळून महाराष्ट्रातील कलागुणांचा गजर करत दिंडी कार्यक्रम काढला त्यावेळेस तर सर्वांनी अगदी उभा राहून प्रतिसाद करत गौरव उद्गार बाहेर काढले सर्व पालक वर्गातून एकच उच्चार बाहेर येते ते म्हणजे एबीएम हे तो भरोसा आहे ही गोष्ट अगदी खरीच आहे असे पालक वर्गाचे मनोगत आले एकंदरीत सर्व कार्यक्रमा अत्यंत उत्स्फूर्त सहभागा त यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकात्तर कर्मचारी विद्यार्थी पालक वर्ग यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले.

शाळा सि.बी.एस.ई. मंडळाशी संलग्न झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. शाळेच्या अभिप्राय पुस्तकामध्ये उत्कृष्ठ शाळा शेरा देऊन शाळेच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

 
 
 
 
abm facebook abm instagram abm youtube channel abm whatsapp number App on playstore